२६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर अभिनेते राज बब्बर यांना २ वर्षाची शिक्षा

 

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांना लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयाने २६ वर्ष जुन्या एका प्रकरणामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मतदान अधिकाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे राज बब्बर यांना मोठा धक्का बसला आहे.

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण | २ मे १९९६ रोजी चे हे संपूर्ण प्रकरण आहे. वजीरगंजमधील एका मतदान अधिकाऱ्याने राज बब्बर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. राज बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी बुथमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याचा माहिती मतदान अधिकाऱ्याने दिली होती. याच प्रकरणी त्यांना शिक्षा ठोकावण्यात आली आहे.

सपाचे उमेदवार राज बब्बर आणि शिवसेना यादव आपल्या पाच सहा साथीदारांसोबत मतदान केंद्रावर आले आणि बनावट मतदान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यावेळी फिर्यादी शिवकुमार सिंह यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये ते जखमी झाले. त्यांना मतदान अधिकारी मनोज कुमार श्रीवास्तव आणि पोलिसांनी वाचवलं. नंतर २३ सप्टेंबर १९९६ रोजी पोलिसांनी राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले.

Team Global News Marathi: