बनावट रेमडेसिविरच्या विक्री प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक

सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. अशा कठीण संकटात सुद्धा काही समाजकंठके हेराफेरी करून लोकांना लुबाडण्याचा काम करत आहे. अशातच आता बनावट रेमडेसिविरच्या विक्री प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. सदर व्यक्ती विश्व हिंदू परिषदेचा सदस्य प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे,

समोर आलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे नर्मदाचे प्रमुख सरबजीत सिंह मोखा यांना अटक केली आहे. जबलपूरच्या सिटी रुग्णालयाचेही सरबजीत हे प्रमुख आहेत. इंदूर येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळवत रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सरबजीत यांचे मॅनेजर देवेंद्र चौरसीया, सपन जैन यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर औषध कंपन्यांसोबत डिलरशीपची जबाबदारी होती.

बनावट रेमडेसिविरची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सपन जैन यांना ७ मे रोजी जबलपूर येथून अटक करण्यात आली. दरम्यान विश्व हिंदू परिषदेने पोलिसांच्या कारवाईनंतर सबरजीत यांना पदावरुन काढून टाकले आहे. तसेच त्याच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे.

Team Global News Marathi: