स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना जात नसते कडक कारवाई करा – चित्रा वाघ

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड आज सहकुटुंब पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहे. संजय राठोड यांच्याकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे. स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच संजय राठोड ज्या समाजाचे आहेत पूजा चव्हाणही त्याच समाजाचू मूलगी होती. बंजारा समाजातील अनेक नेते मला फोन करुन याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. वाघ यांनी प्रथम या प्रकरणी संजय राठोड यांचे नाव घेतले होते तसेच या प्रकरणी राठोड यांनी राजीनामा दिला होता.

Team Global News Marathi: