सांगली मानपामध्ये भाजपचा पराभव, चंद्रकांत पाटलांना जोरदार धक्का

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात राष्ट्र्वादीने भाजपाला जोरदार धक्का दिल्यानंतर आता सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेमध्ये राष्ट्र्वादीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपाची सत्ता होती. महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक होणार होती. या निवडणुकीत भाजपाला धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादीने आधीपासूनच आखली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्याने चुरस वाढली होती. पैकी पाच नगरसेवक निवडणुकीत फुटल्याचे समोर आले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. सांगली महापालिकेत एकूण ७८ सदस्य आहेत. पैकी एका सदस्याचा मृत्यू झाल्याने ७७ मतदार राहिले होते. त्यातील दोघे जण तटस्थ राहिले. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

‘सांगली-मिरज-कुपवाड मनपाच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्विजय सूर्यवंशी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध रहाल याचा मला विश्वास आहे. असे उदगार मंत्री जयंत पाटील यांनी विजयी उमेदवारांसाठी काढले आहेत.

Team Global News Marathi: