विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ब्राह्मण समाजाची नाराजी

 

औरंगाबाद | औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी काल ब्राह्मण समाजावर भाष्य करत नाव वाद अंगावर ओढवून घेतला आहे. ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या होत्या. विनायक राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता.

यावर विनायक राऊत यांनी माफी मागितली आहे ते म्हणाले की, औरंगाबाद खासदार विनायक राऊत ब्राह्मण समाजाच्या भेटीला पोहचले. ‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही’ असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला होता. आज ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेताना आनंद झाला.

काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांना कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा असंही म्हटलं मात्र दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्द्याचं राजकारण करून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Team Global News Marathi: