राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली तर केंद्राचे दुर्दव्य – राऊत

भाजपा नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्री पद मिळण्याची जोरदार चर्चा आता राज्यात सुरु झालेली आहे. या चर्चेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी खोचक टीका विनायक राऊतांनी राणेंवर केली होती. पुढे बोलताना ते म्हणाले, बुडत्याला काडीचा आधार, असा टोलाही राऊतांनी लगावला होता.

पुढे राणे यांनी मुख्यमंत्रीनां केलेल्या फोनवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतले. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचे काम केले, राणेंचा तो परीपाट आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी आधीही टीका केली होती.

Team Global News Marathi: