नवी मुंबईत गुटखा किंग निघाला शिवसेनेचा पदाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी निघाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. अन्न औषध प्रशासन विभागाकडून एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये गुटखा ठेवलेल्या पाच पानाच्या टपऱ्या सील करण्यात आल्यात. त्यामध्ये बंदी असणाऱ्या विविध प्रकारचा गुटखा सापडला.

सदर घटना प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने ४ जणांना ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये मुख्य सूत्रधार गुटखा किंग राजन गुप्ता उर्फ मुन्ना कित्येक वर्षांपासून गुटख्याचं व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे गुटखा किंग शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने खळबळ उडाली आहे.

राजन गुप्ता उर्फ मुन्ना शिवसेना उत्तर भारतीय विभाग बेलापूर विधानसभा उपशहर संघटक पदावर आहे. याशिवाय तो खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बरोबर अनेक मंचांवर उपस्थित असल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता या पदाधिकाऱ्यावर शिवसेना काय कारवाई करते हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: