विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केली भावनिक पोस्ट

 

मुंबई | अभिनेता रितेश देशमुखने वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त एक भावनिक पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली आहे.या पोस्टमध्ये मध्ये रितेशने वडीलांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याचे दोन्ही मुले विलासराव देशमुख यांच्या फोटोसमोर हात जोडताना दिसून येत आहे. अभिनेत्याने या फोटोसोबत एक पोस्टही लिहिली आहे.

रितेश देशमुख एक अभिनेता म्हणून तर उत्तम आहेच शिवाय एक मुलगा, पती आणि बाबा म्हणूनदेखील तो सर्वोत्कृष्ट आहे असंच म्हणावं लागेल. अभिनेता आपल्या कुटुंबाशी किती कनेक्टेड आहे हे वारंवार दिसून येतं. रितेश देशमुखने आयुष्यात बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. परंतु एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्या नसण्याची उणीव त्याच्या मनात कायम आहे. ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री आणि रितेशचे वडील विलासराव देशमुख हे होय.रितेश आपल्या वडिलांच्या फारच जवळ होता. त्याला सतत आपल्या वडिलांच्या आठवणीत भावुक होताना सर्वांनीच पाहिलंय.

वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने पोस्टमध्ये लिहिले, ‘मला तुम्हाला मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठिवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायमसोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची आठवण येते.’ अशी भावनिक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.

Team Global News Marathi: