विजयसिंह पंडित यांनी जागवल्या वडिलांच्या दूरदृष्टीच्या 44 वर्षांपूर्वी च्या आठवणी

जय भवानी सहकारी साखर कारखान्याने ३८ व्या गळीत हंगामातील एक लक्ष मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण केले, या निमित्ताने…

ग्लोबल न्यूज: बीड जिल्ह्याच्या राजकारणा तील एक बडे प्रस्थ व माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी स्थापन केलेल्या व सध्या जोरात सुरू असलेल्या गेवराई तालुक्यातील गढी येथील जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 38 व्या गळीत हगामच्या निमित्ताने त्यांचे धाकटे सुपुत्र बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराजे पंडित यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

याबाबत फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये विजय सिंह पंडित यानी म्हटले आहे की,

सन १९७६ मध्ये म्हणजे माझ्या जन्माच्या एक वर्ष आधी जय भवानी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बीड जिल्ह्यातील सगळ्यात जुना परंतु सुरू असलेला कारखाना म्हणून आज जय भवानी कडे पाहिले जाते. अनेक संकटावर मात करत आधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत असलेल्या आत्ताच्या काळातील नवीन कारखान्याप्रमाणे जय भवानीचा हंगाम सुरू आहे. वास्तविक पाहता आजच्या काळातील कारखान्यातील मशिनरी आणि तंत्रज्ञानाची तुलना ही त्या काळाशी होऊ शकत नाही.

मधल्या काही काळात कारखाना अडचणीत आणण्यासाठी, सुरू न होऊ देण्यासाठी जाणीवपूर्वक झालेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. या वर्षी ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहे. परंतु तालुक्यातील सर्व सभासद आणि नोंदणीकृत शेतकरी बांधवांचा ऊस घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

आज कारखाना आधुनिक पद्धतीने, नवीन यंत्र आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गरुड झेप घेऊ पाहतोय. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दादांनी लावलेल हे रोपटं आज वटवृक्ष झालंय. याच सर्व श्रेय शेतकरी सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांना जाते. कारखाना अडचणीत असताना आमच्यासह शेतकरी आणि कर्मचारी वर्गाचे देखील नुकसान झाले. परंतु या काळात देखील कारखाना स्थापनेपासून असलेले सभासद, कर्मचारी जराही न डगमगता पाठीशी उभा राहिले येथे त्यांचे आभार मानने मी माझे कर्तव्य समजतो.

यानिमित्ताने सन १९७६ मध्ये जय भवानीच्या भूमिपूजनाचा फोटो आपल्या सोबत शेयर करतोय. ज्यामध्ये आदरणीय दादांसोबत भैय्या व जयभाऊ दिसत आहेत. त्या बालवयात या दोघांना जबाबदारीची जाणीव नव्हती परंतु या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात आणि त्याला सक्षम करण्यात आज या दोघांनी घेतलेले परिश्रम आणि त्याच झालेल चीज पाहता नक्कीच मनाला अभिमान आणि समाधान वाटते..!!!

ग्लोबल न्युज नेटवर्क: