सरनाईक विरोधात तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर विरोधात मुंबई पोलिसांची कारवाई

सरनाईक विरोधात तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर विरोधात मुंबई पोलिसांची कारवाई

सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीकडून टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील मुख्य तक्रारदार असलेले रमेश अय्यर विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करत तक्रार नोंद केली आहे. अय्यर विरोधात टॉप्स सिक्युरिटी मध्ये आर्थिक फसवणुकीचा ठपका ठेवत टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

रमेश अय्यर यांच्या तक्रारीमुळेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तसेच विहंग सरनाईक यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता मुंबई पोलिसांनी अय्यर यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याने मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना रंगणार असेच चिन्ह दिसून येत आहे.

टॉप्स सिक्युरिटीचे मालक आणि सरनाईक यांचे पार्टनर राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप नंदा यांनी केला. दरम्यान, रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार असून त्यांचा मित्र अमित चांदोळेला अटक झाली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: