विद्यार्थिनीला आठ तासांत शोधून काढले; मुंबई पोलिसांचे होतंय सर्वत्र कौतुक

 

कळसाला जाते असे सांगून घरातून निघून गेलेल्या विद्यार्थिनीला एमएचबी पोलिसांनी आठ तासांत शोधून काढले आहे. त्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱयांची तपासणी केली. एमएचबी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून मुंबई पोलिस हे देशातील उत्कृष्ट पोलीस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पीडित विद्यार्थिनी ही दहिसर परिसरात राहते. रविवारी ती टय़ुशनला जाते असे सांगून घरातून निघाली. सायंकाळी विद्यार्थिनी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी टय़ुशनमध्ये पह्न करून चौकशी केली तेव्हा ती टय़ुशनमध्ये आली नसल्याचे तिच्या पालकांना सांगण्यात आले. कुटुंबीयांनी एमएचबी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

त्यापाठोपाठ वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नाग टिळक, सहाय्यक निरीक्षक सूर्यकांत पवार, शीतल पाटील, उपनिरीक्षक जिरोणेकर आणि पथकाने तपास करून याचा छडा लावला.

Team Global News Marathi: