विदर्भ माझे आजोळ आहे, त्याला माझ्यापासून तोडू नका – उद्धव ठाकरे

 

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस येत्या ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येईल. तसेच येत्या १० मार्च रोजी अर्थसंकल्प अधिवेशनाची सांगता होईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत होते. सुधीर मुनगंटीवारांचे भाषण पाहताना नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला. राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केले ही मोठी गोष्ट आहे. तर तिसऱ्या दिवशी भाजपा नेते शेतकरी भरपाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी वीज धोरण जाहीर केले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार आहोत असे सुद्धा त्यांनी यावेळी जाहीर केले होते. तसेच शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

पुढे विदर्भ संदर्भात भाष्य करताना म्हणाले की, विदर्भ माझे आजोळ आहे याची आठवण पुन्हा एकदा विरोधकांना करून देतो त्याला माझ्यापासून तोडू नका. विदर्भाला महाराष्ट्रापासून तोडू नका. बाळासाहेबांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं हिंदुत्व शेंडी जाणव्यांचं नव्हतं.राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी केली पण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला याची आठवण विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी करून दिली होती.

Team Global News Marathi: