आता कोरोना लसीकरण मोहीम चालणार २४ तास केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा निर्णय

देशभरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. या पहिल्या टप्यात वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली होती. त्या पाठोपाठ १ मार्च पासून ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि इतर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना लस टोचण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आता लसीकरण मोहीम अधिक जलद होण्यासाठी केंद्राने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नागरिक आपल्या सुविधेनुसार, दिवसातल्या २४ तासांत कोणत्याही वेळेस लसीकरणासाठी वेळ निश्चित करू शकतात. दिवसा आणि रात्रीही लसीकरणाची सोय उपलब्ध राहणार आहे. याची घोषणा खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे.

करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता 24X7 आपल्या सुविधेनुसार लसीचा डोस घेऊ शकतात. पंतप्रधान देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचं महत्त्वही जाणून आहेत. वेळेची ही सुविधा आता सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांना लागू होईल असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे.

Team Global News Marathi: