ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकारच्या झटक्याने निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकारच्या झटक्याने निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्लोबल न्यूज : मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ९६ वर्षाचे होते. रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी अमरावतीत झाला होता.

त्यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. १९५१ साली पाटलाची पोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मारतो एक डोळ्या या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली होती. त्यांनी मराठीत आधी खलनायक म्हणून काम केले.

त्यानंतर देवघर, साता जन्माची सोबती, पैश्याचा पाऊस, जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटात काम केले. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या आनंद या चित्रपटातली त्यांची भूमिका विशेष गाजली. आनंदसोबत त्यांनी आरती, मेरे अपने, आपकी कसम या चित्रपटातही काम केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: