ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात |

 

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज वयाच्या ९८ व्या वर्षी जगाला निरोप घेतला. आज सकाळी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.मागच्या काही दिवसापासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होेते. दरम्यान त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार असल्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तशा सूचनाही दिल्या आहेत. सांताक्रुझ येथील जुहू कब्रस्तान येथे सायंकाळी ५ वाजता दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांना वाहिली श्रद्धांजली, ‘भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

 

Team Global News Marathi: