वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा निषेधार्थ युवासेनेचे राज्यभरात आंदोलन

 

राज्यभरात युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे आज १५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे.

‘शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. तसेच या विरोधात युवासेना आक्रमक झाली आहे.

फॉक्सकॉनबाबत सरकारने अद्याप खुलासा केलेला नसून फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटे मेसेज फिरवण्याची कामं हे सरकार करतंय. तर शिंदेंनी 40 आमदारांसह मोठे प्रकल्पही पळवले, असा आरोप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. याच पार्श्वभूमीवर वेंदाता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आता युवासेना आक्रमक झालीय. शिंदे सरकारविरोधात उद्या युवासेना राज्यभर आंदोलन करणारेय. तर खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळेच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.

Team Global News Marathi: