मुंबईत अ‍ॅमेझॉनच्या वेअर हाऊसची तोडफोड, राज ठाकरे यांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात उमटू लागले पडसाद

मुंबईत अ‍ॅमेझॉनच्या वेअर हाऊसची तोडफोड, राज ठाकरे यांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात उमटू लागले पडसाद

अ‍ॅमेझॉन कंपनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील मराठी भाषिक वाद चांगलाच गाजला आहे. त्यात अ‍ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना कोर्टात खेचले होते. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आता अ‍ॅमेझॉनचे मंबईतील गोडाऊनची तोडफोड केली आहे.

अमेझॉनने वकीलाच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे मनसैनिकांनी नाराज होऊन आज मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार येथील मारवे रोडवर असलेल्या अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. हे सर्व मनसैनिक चांदीवली मतदार संघातील आहेत.

यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांंनी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील मनसेच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे अ‌ॅमेझॉन आणि मनसे वाद आणखी चिघळला आहे.

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या मालाची डिलिव्हरी होऊन देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: