गृहमंत्र्यांकडून रामदास आठवलेंना त्यांच्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

गृहमंत्र्यांकडून रामदास आठवलेंना त्यांच्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना संपूर्ण देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा आठवले यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये कवितेच्या माधमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी | बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी || पण आज दिवस आहे जल्लोषाचा | कारण वाढदिवस आहे भारी कवीचा || युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग | आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग || आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यावर लवकर बरे होण्यासाठी कोरोना गो-गो गाणे गाऊन लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. “करोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा,” अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: