वंचित आघाडीसोबत इतर समाजातील मतदार जोडा – सुजात आंबेडकर

 

दोन निवडणुकांमध्ये केवळ आपल्या समाजातील ताकतीवर निवडणूक जिंकू शकत नाही, हे आपल्याला समजले आहे. त्यामुळे आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समाजांतील मतदाताही जोडा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले. वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर यांची आज चुनाभट्टी येथील राहुलनगरमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी मतदाता म्हणून समाजातील सर्व घटकांना सामावून घ्यावे, असे आवाहन केले.

दरम्यान, मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचली जाईल, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाला मी 100 टक्के पाठिंबा देतो. फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा, त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्यावा पण समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवू नये, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.

यावेळी मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, मुस्लिम बहुजन आघाडीचे सय्यद मंजूर, मुंबई निरीक्षक कलम खान, मुंबई महासचिव आनंद जाधव, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा अध्यक्ष कृतिका जाधव, सतीश अमुलगे, स्वप्नील जवळगेकर आदी उपस्थित होते. आता या टीकेला मनसे काय प्रतिउत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: