‘समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, चित्रा वाघ संतापल्या

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षामध्ये मुख्य लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, काल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना त्यांच्या सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपनं कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या.

कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. आता या आरोपांना काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: