वैरागच्या हिंदू – मुस्लिम मैत्रिणींनी गणेशाचे केले अनोखे स्वागत ; व्हिडिओ झाला व्हायरल

वैरागच्या हिंदू – मुस्लिम मैत्रिणींनी गणेशाचे केले अनोखे स्वागत ; व्हिडिओ झाला व्हायरल

वैराग / प्रतिनिधी : विघ्नहर्ता श्री. गणरायाचे आगमन जल्लोष पुर्ण वातावरणात सर्वत्र होत आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत होत असतानाच वैराग येथे अनोख्या पद्धतीने बाप्पाचे स्वागत झाले आहे.

वैराग येथील रिलॅक्स झोन ब्यूटी पार्लरच्या संचालिका आयेशा इम्तियाज पठाण यांनी बाप्पाच्या मुर्तीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. मुस्लिम वेशात बाप्पाचे स्वागत करत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये आयेशा मुस्लिम वेशात गणेशाची मुर्ती घेवून येताना दिसत आहेत तर त्यांच्या समवेत भारती अमोल म्हमाणे यांनी पारंपारिक हिंदू वेशभूषेत पूजेचे ताट घेवून चालत असल्याचे दिसत आहेत.

जाती – धर्माला बाजुला ठेवत हिंदु – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश त्या यानिमित्ताने देताना दिसून येत आहेत. आयेशा या प्रोफेशनल ब्युटिशियन आहेत. राजामती नगर येथे त्या ब्यूटी पार्लर चालवतात. विविध मेकअप आर्टसाठी त्या प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवा निमित्त आयेशा व भारती यांनी मिळून गणेशाचे केलेले स्वागत कौतूकाचा विषय ठरत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: