राज ठाकरेंसोबत आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

 

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जावून भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरु आहे त्या सुनावणीचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला. त्यांना शिवसेनेत राहता येणार नाही, असं कोर्टाने जाहीर केलं.

तर दुसरीकडे शिंदे गटाला भाजप किंवा मनसे या पक्षात सामील होण्याचा पर्याय असेल. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी हे तेच सांगत आहेत. राज ठाकरे यांनी एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भर सभेत सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता त्यांची भाजपसोबतची जवळीक वाढली आहे.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सगळीकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे. एक अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. गणेशोत्सावानिमित्ताने आपण एकमेकांकडे जात असतो. या निमित्तानेच आम्ही राज ठाकरे यांच्या घरी आलो आहोत. सदिच्छा भेट घेतली. त्यांचं मध्ये ऑपरेशन झालं होतं.त्यावेळी येता आलं नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Team Global News Marathi: