लसीकरणाच्या विश्वविक्रम आकड्यावरून पंतप्रधान मोदी यांनी मानले देशवासीयांची आभार

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशातील तमाम जनतेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी देशभरातील तमाम नागरिकांचे अभिनंदन केले आहे. आज कोरोनाच्या विळख्यात असलेल्या भारताला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले आहे.

गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी भारताने १०० कोटी लस डोसचे लक्ष्य साध्य केलं आहे. या यशामागे १३० कोटी देशवासीयांचे कर्तव्य आहे, त्यामुळे हे यश भारताचे यश आहे, प्रत्येक देशवासीयांचे यश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुरुवारी देशानं १०० कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशानं एक नवा विक्रम केला.

भारतानं लसींचे १०० कोटी डोस देण्याचा आकडा पार केला. तसंच गेल्या १०० वर्षांच्या सर्वात मोठ्या जागतिक साथीला सामोरे जाण्यासाठी देशाकडे आता लसींच्या १०० कोटी डोसचे मजबूत संरक्षण कवच आहे. हे भारताचे, देशातील प्रत्येक नागरिकाचं यश आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचे आभार १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणून भारताने इतिहास रचला आहे असे विधान केले आहे.

हा लसीकरणाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतवासियांचे अभिनंदन. आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि ज्यांनी-ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार. आजपासून चित्रपटगृहे Unlock,नाट्यगृहात होणार तिसरी घंटा भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ २७९ दिवसांत हा विक्रम घडला आहे.

Team Global News Marathi: