रशियात पुन्हा कोरोनाची लाट; १ आठवड्यासाठी लॉकडाऊन

रशियात पुन्हा कोरोनाची लाट; १ आठवड्यासाठी लॉकडाऊन

 

कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच लोकांनाही घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी, २८ ऑक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

 

मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे की सर्व दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद असतील. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापौर सोब्यानिन म्हणाले की केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल.

 

पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे. रशियामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोविड -१९ मुळे १,०२८ लोकांचा मृत्यू झाला. महामारीच्या प्रारंभापासून एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. रशियामध्ये साथीच्या आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या २२६,३५३ झाली आहे, जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. हे पाहता, सरकारच्या मंत्रिमंडळाने असे सुचवले होते की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एक आठवड्यासाठी सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: