लसीकरण वाढवण्यासाठी खाजगी रुग्णालयांना परवानगी द्या – राजू पाटील

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

दरम्यान, सध्या राज्यात आणि देशात कोरोना लस उपलब्ध झाली असून केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून केली आहे.

आमदार पाटील यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा. असे ट्विट त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: