शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवीला रवाना, काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड आज सहकुटुंब पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहे. आज सकाळी १२ च्या सुमारास ते पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राठोड यांच्याकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी जवळपास १५ ते २० हजार लोक जमतील, अशी माहिती पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज नेमकं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे नाव घेऊन एकचं खळबळ उडवून दिली होती.

Team Global News Marathi: