लसीकरण म्हणजे उपकार नाही, ‘यूजीसी’च्या सूचनेवरुन रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

 

मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्वच विद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचा फतवा काढला होता. देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कॅम्पसमध्ये फलक लावून मानावेत, अशी सूचना आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्हॉट्सअप संदेशातून विद्यापीठांना केली आहे. मात्र विदयापीठ अनुदान आयोगाकडडून काढण्यात आलेल्या आदेशावर आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठा अनुदान आयोगाने केल्या आहेत.

लोकांनी भरलेल्या टॅक्समधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही, तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण, मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची यूजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मात्र पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी शिक्षण विभागातील मंत्र्यांच्या सूचनेनुसार यूजीसीने हा निर्णय घेतला असावा. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे. कोरोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये!, असेही रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

Team Global News Marathi: