अमेरिका पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार युरोप दौऱ्यावर |

 

नवी दिल्ली | अमेरिका पाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. इटलीमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेला मोदी उपस्थिती लावणार आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी इटलीच्या रोममध्ये जी-२० शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. यात मोदींसह अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित राहणार आहे.

जी-२० शिखर परिषदेशाच्या दौऱ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारकडून जोरदार तयारी केली जात आहे. अर्थात अद्याप मोदींच्या युरोप दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच जी-२० शिखर परिषदेचे सदस्य देशांचे नेते असे एकत्रितरित्या भेटणार आहेत. याआधीची परिषद व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडली होती.

गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जी-२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं होतं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाची विधानं केली होती. यात मोदींनी दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोना महामारी हे संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या परिषदेला उपस्थित होते.

Team Global News Marathi: