महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशिकचा भाऊ ?

 

अभिनेता विकी कौशल कतरिना कैफच्या प्रेमात आहे. सध्या विकी व कॅटच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. पण कौशल कुटुंबाचा धाकटा मुलगा सनी कौशल हा सुद्धा मागे नाही. सनी कौशीर सुद्धा भावाप्रमाणेच त्याच्या अफेअरची सुद्धा जोरदार चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासोबत सनीचं नाव जोडलं जातं आहे.

शर्वरी व सनी यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं म्हटलं जातं आहे. या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडे शर्वरी ‘शिद्दत’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली. सनीसोबत तिनं मस्तपैकी पोझ दिल्या आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चेला आणखी बळ मिळालं.

शर्वरी ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे, ते कोण तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि आई आर्किटेक्ट आहे.
शर्वरीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजमधून तिचा अ‍ॅक्टिंग डेब्यू झाला. शर्वरी लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘बंटी और बबली’च्या सीक्वलमध्ये ती मुख्य भूमिका दिसणार आहे.

 

Team Global News Marathi: