नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात केली भात लागण !

 

सातारा | सध्या संपूर्ण राज्यभरात दमदार पाऊस होत असून हा पाऊस पिकांच्या पेरणीसाठी पोषक आहे. सध्या साताऱ्याच्या पश्चिमेकडे सध्या भात लावण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली आहे. या परिसरातील डोंगर पायथा असलेल्या भागात भात हे प्रमुख पीक असून पावसाने दडी मारल्याने परिसरातील भात लागण रखडली होती. मात्र, सध्या चांगल्या प्रकारे पाऊस पडू लागल्यामुळे शेतकऱयांकडून भातलागणीला सुरुवात करण्यात आले आहे.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपले सातारा जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या दरे तर्फ तंब येथे भात लागण केली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांचा महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तंब येथे जन्म झाला आहे. एकनाथ शिंदे हे बऱ्याच वेळा जन्मगावी दरे तर्फ तांब या ठिकाणी येत असतात. गावात असणाऱ्या शेतीकडे त्यांचा जास्त कल आहे.

सध्या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. त्यामुळे शेतात भटलागणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे त्यांनीही आपल्या शेतातील कामात हातभार लाट पारंपरिक पद्धतीने हातात भाताचे तराव घेऊन रोपण केले. सध्या शिंदे शेतात भटलागणीचे काम करत सलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

Team Global News Marathi: