देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरची आमदाराने उडवली खिल्ली, या पेक्षा मोठा जोक नाही |

 

पुणे | “पुणे तिथे काय उणे” पुण्यातील बॅनर बाजीची नेहमीच सर्वत्र चर्चा होत असते. आता, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोटोवरील कॅप्शनमुळे पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी बॅनरचा वाद रंगला आहे.

पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. या मोठ्या होर्डिंग्जवरील एका कॅप्शनवरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. शहरातील या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नव्या पुण्याचे शिल्पकार, असा करण्यात आला आहे.

याच हेडिंगवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त असे ट्विट करत टोला लगावला आहे.

 

Team Global News Marathi: