उरलेला पक्ष वाचवण्यासाठी आंबेडकर – ठाकरे एकत्र, भाजपा नेत्याचा टोला

‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात युती करण्याचे स्पष्टपणे संकेत दिले.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा निवडणुका जाहीर होतील, तेव्हा आम्ही एकत्र येऊ, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले.

आता प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावरून भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंवर व्हिडीओद्वारे टीकास्त्र सोडले आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे परस्परविरोधी विचारांचे असून आपला उरलेला पक्ष वाचवण्यासाठी ते एकत्र येत आहेत, असे ते म्हणाले. आता या टिकेवरून नव्या आदला सुरवात होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

“प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे लोकशाही वाचवण्यासाठी नाही तर त्यांचा उरलेला पक्ष वाचवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. ‘रिडल्स ऑफ रामायणा’च्या वादावरून प्रकाश आंबेडकर जेव्हा हुतात्मा चौकात गेले होते. तेव्हा शिवसेनेने तो हुतात्मा चौक गोमूत्राने स्वच्छ केला होता. ही बाब प्रकाश आंबेडकर विसरले असतील. पण महाराष्ट्राची जनता विसरली नाही.” अशी आठवण त्यांनी करून दिली.

 

Team Global News Marathi: