साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान

 

ठाकरे गटाचे नेते अनिब परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले दावे फेटाळून लावले आहेत. साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. न्यायालयाने या प्रकरणात ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत, असे अनिल परब म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे. अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.

मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश होता. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. साई रिसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही. साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल, असे अनिल परब यांनी सांगितले.

Team Global News Marathi: