भाजपाच्या ४ केंद्रीय मंत्र्यांची राज्यात १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा

 

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे,डॉ.भारती पवार,डॉ.भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत,अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या यात्रेचे प्रमुख आ.संजय केळकर यावेळी उपस्थित होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात ,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे.

यात्रेचे प्रमुख आ. संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा ठाणे,रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे.डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर,नाशिक,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करेल.डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदार संघात ६२३ किलोमीटर प्रवास करेल.

Team Global News Marathi: