अनंत गितेंनी पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून पाठराखण !

 

मुंबई | शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या तसेच खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा आनंद गीते यांचा समाचार घेतला होता, मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून त्यांच्या वक्तव्याची पाठराखण करण्यात आली आहे.

राणेंनी झी २४ तास या वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत गीतेंनी उपस्थित केलेला मुद्दा वास्तववादी असून, त्यांना आता कदाचित फासावर लटकवतील असं राणे म्हणाले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गिते हे ‘अडगळीतले नेते’ अशी मिश्किल टिप्पणी गितेंवर केली. अनंत गिते यांनी उपस्थित केलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठी झाली आहे. यामध्ये हिंदुत्वाचा किंवा निष्ठेचा भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाला मूठमाती दिली.” असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर तोफ डागली.

दरम्यान, “गितेंवर कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांना विचारणा केली असता, “अजून काय वाकडं करू शकतात. गिते यांना कदाचित फासावर लटकवतील. त्यांना दुसरं काय येतं. अनंत गीतेंची जी अवस्था आहे, तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही अशा टीका देखील नारायण राणेंनी शिवसेनेवर केली होती.

Team Global News Marathi: