केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत लगावला टोला !

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून अतिरिक्त कोरोना लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याचा आरोप आरोग्यमंत्री टोपे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सर्व आरोप फेटाळून राज्य सरकारखडेबोल सुनावले होते. याचा संदर्भ घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले की, लसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. महाराष्ट्रात इंजेक्शनचा पत्ता नाही, लसीकरणासाठी तुमचा योग्य कारभार नाही. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या, असेही पाटील म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आठवीतल्या विद्यार्थ्यांनाही कळतं, अनिल परब यांची गृह खात्यात लुडबूड होतेय, याबद्दल शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांनी विधानसभेतही वाझेंप्रकरणात विशेष लक्ष घातले होते. यावरुन, कुणालाही लक्षात येतं. सध्याच्या परिस्थितीवरुन सर्वसामान्य माणसांना वीट आलाय, असेही चंद्रकात पाटील यांनी म्हटले.

Team Global News Marathi: