कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार आढावा

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५०% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल.

यामध्ये झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या ४८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य मंत्र्यालायाच्या माहितीनुसार, २७ राज्यातील ४८ जिल्ह्यांमध्ये लसीकरण संथ गतीनं सुरु आहे. उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील ९ जिल्ह्यात 50 टक्केंपेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

Team Global News Marathi: