आदित्यजी ‘या’ गोष्टींवर पैसे वाया घालवू नका, या अभिनेत्याचा सल्ला

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या मतदार संघाकडे खास लक्ष देत असल्याचं पाहायाला मिळतंय. यातुनच त्यांनी वरळीतीली काही ट्राफीक सिग्नलवर दृष्यमानता आणि सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत रोषणाई केली असून, त्याचे फोटो आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट आता एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे.

वरळीतील ट्राफीक सिग्नलची दृष्यमानता वाढवण्यासाठी खांबावर केलेल्या विद्युत रोषणाईचा फोटो ट्विट करत आदित्य ठाकरेंनी याची माहिती दिली. मात्र आता प्रसिद्द मराठी अभिनेता सुमीत राघवन यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करण्याचा साला दिला आहे.

” आदित्य जी, कृपया या गोष्टींवर पैसे वाया घालवू नका. या ‘हाय व्हिजिबिलिटी सिग्नल्स’चा काही उपयोग नाही. उलट या फॅन्सी लाइट्सची देखभाल ही आणखी एक समस्या आहे.” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. कृपया वाहन चालकांना संवेदनशील करण्यासाठी चांगली योजना आणा असा सल्ला देखील दिला. सुमीत राघवन यांच्या या ट्विटमुळे या सिग्नलची मात्र चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या टीकेला आदित्य ठाकरे उत्तर देणार का हे आता पाहावं लागणार आहे.

 

Team Global News Marathi: