गॉड गेमच्या नावाखाली राज कुंद्राकडून ३ हजार कोटींचा घोटाळा, राम कदम यांचा गंभीर आरोप !

 

मुंबई | पॉर्न फ्लीम प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हिची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. तसेच त्याच्या बँक अकाऊंटची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. मात्र आता भाजपा आमदार राम कदम यांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप लागवाले आहेत.

राज कुंद्रानं हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. कुंद्रानं गरिबांची फसवणूक केली आहे. गॉड गेमच्या नावावर त्यानं लोकांकडून ३०-३० लाख रुपये घेतले आणि ते त्यांना कधीच परत केले नाहीत, असा आरोप कदम यांनी केला आहे.

‘राज कुंद्रानं या गेममध्ये पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाचा आणि फोटोचा वापर केला. देशभरातल्या अनेकांना त्यानं मूर्ख बनवलं आणि पैसे कमावले. राज कुंद्रानं अडीच हजार ते तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लोक जेव्हा त्याच्या कार्यालयात त्याच्याकडे पैसे मागायला गेले, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच पीडितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली. वियान इंडस्ट्रीच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला, असा गंभीर आरोप कदम यांनी केला.

Team Global News Marathi: