मुख्यमंत्री हे बाळासाहेबांचे वंशज आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ !

 

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. मागच्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली. पाऊस थांबला असला तरी पुराचं पाणी कमी झालं नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंगवाडी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धौर्यशील माने आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मुख्यमंत्री आपल्या गावात येत असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिक मागून आवाज देत होते. त्यानंतर मुख्यमंत्री आवाज देणाऱ्या नागरिकांजवळ गेले आणि त्यांच्या व्यथा ऐकल्या. यावेळी स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं

मुख्यमंत्री हे बाळासाहेबांचे वंशज आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले. आमचं त्यांनी ऐकून घेतलं. आमच्या मागण्या मुख्यमंत्री नक्की पुर्ण करतील, असा माझा पुर्ण विश्वास आहे, असं कोल्हापूरातील स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून योग्य ती मदत करावी. सरकारने जाहिर केलेली १० हजारांची मदत वाढवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: