“काका संजय गांधी यांनी माझे वडील राजीव गांधी यांचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित अपघात झाला नसता”

 

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रथमच आपले काका संजय गांधी यांच्या विमान अपघातासंदर्भात भाष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, जर काका संजय गांधी यांनी माझे वडील राजीव गांधी यांचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित अपघात झाला नसता, असे राहूल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे विमान उडवण्याचा शौक आहे. वडील राजीव गांधी यांची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की पायलट असणे सार्वजनिक जीवनातही बरेच काही शिकवते.

गुरुवारी काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. राहुल गांधी म्हणाले की, ज्या दिवशी राजीव यांचे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले, त्या दिवशी राजीव यांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही आणि काही क्षणातच ही घटना घडली होती.

भारतीय युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनात बनवलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी वडिलांसोबत विमानात घालवलेल्या आठवणी सांगितल्या. ते दररोज सकाळी वडिलांसोबत विमानात बाहेर जायचे आणि दोघांनाही विमान उडवणे आवडायचे. व्हिडिओमध्ये राहुलने त्यांचे काका संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची आठवण करून दिली आणि सांगितले की, ज्या दिवशी भीषण अपघात झाला त्या दिवशी राजीव गांधींनी आपल्या लहान भावाला विमान उडवण्यास मनाई केली होती.

Team Global News Marathi: