” केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं”

 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही मंदिरे उघडी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घातलेला नाहीये. मात्र दुसरीकर केंद्रात सत्तेत असलेल्या आणि महाराष्ट्रात विरोधात बसलेल्या भाजपने मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन राबवले होते. त्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. पण मंदिरांचा विचार का केला जात नाही. असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले, सध्या राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल. ”केंद्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशी त्यांनी सांगितलंय. आम्हालाही नागरिकांच्या भावनांचा आदर आहे. सध्या राज्यात मंदिर उघडण्याबाबत भाजप आंदोलन करतं आहे. त्यांनी केंद्राने दिलेल्या सूचनांची माहिती करून घ्यावी. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.”

पुणे शहर सोडलं तर ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्या भागातील नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यात रुग्ण अधिक आहेत. त्यामध्ये शाळा सुरु करणे हे सरकरसमोरील आव्हानच असणार आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही पवार म्हणाले.

Team Global News Marathi: