उमेदवारीसाठी १० फोन करत होता, आता प्रशासकीय यंत्रणा घेऊन निवडणूक लढा

 

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा चांगलाच उद्रेक झाला आहे. काल शिवसेनेकडून बंडखोर धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला होता.दरम्यान, काल बंडखोरी केल्यानंतर संजय मंडलिक पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये प्रकट झाले.

कोल्हापुरात दाखल झाल्यावर त्यांनी बोलताना त्यांनी मुळ शिवसेनेमध्ये अ आणि ब असे दोन गट असल्याचे म्हटले होते. राज्यातील घटनेशी आमचा संबंध नसून लोकसभेतील गटनेता बदलला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवरून कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संजय मंडलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

संजय मंडलिक यांच्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी काम केल्याचे सांगत त्यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचे ते म्हणाले. लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती तेव्हा संजय पवारला 10 फोन करत होता, मंडलिक यांनी आता प्रशासकीय यंत्रणेलाच घेऊन निवडणूक लढवावी असा पलटवार त्यांनी केला आहे. खासदार मंडलिक यांच्याही घरावर लवकरच जाऊन जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.

चांगल्या माणसाची कशी फसवणूक केली गेली हे पाहिलं गेल्याचे संजय पवार म्हणाले. गलिच्छ राजकारण यांनी केल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा शिवसैनिकांनी प्रार्थना केल्या होत्या. मात्र, ज्या पद्धतीने यांनी षड्यंत्र रचलं त्याचा राग ठाकरेंनी व्यक्त केल्याचे ते म्हणाले, आईचं दूध विकण्याचं पाप या लोकांनी केल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचा नेता; शरद पवारांच्या जागी या खासदाराची वर्णी

आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार सुद्धा नाही – राजेश क्षीरसागर

Team Global News Marathi: