“संजय राऊतांचे पाऊल आमच्या छाताडावर यायच्या आत त्यांच्या डोक्यावर आम्ही पाय देऊ”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन स्वपक्षाविरोधात बंड केलं. यानंतर राज्यातील पूर्ण राजकारण पलटून गेलं. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे. यानंतर महाराष्ट्रात शिंदे गट विरुद्ध संजय राऊत संघर्ष सुरु झाला. संजय राऊतांच्या एका टीकेला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार पलटवार केला.

याआधी संजय राऊत म्हणाले होते कि, फुटीर गटाच्या आमदारांना आपल्यासोबत राखण्यासाठी शेवटचा प्रयत्न सुरू असून त्यांच्या नव्या कार्यकारणीला काही अर्थ नाही, आधी विधीमंडळात कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 झाला, आता त्याच्या दुसरा भाग सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले. या देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल असंही ते म्हणाले. फुटीर आमदारांनी त्यांचा मालक बदलला, आता शिवसेनेचे पाऊल त्यांच्या छाताडावर असेल असंही ते म्हणाले होते.

यानंतर यावर आता शहाजीबापू पाटील म्हणाले कि, संजय राऊत यांचं पाऊल आमच्या छाताडावर यायच्या आगोदर त्याच्या डोक्यावर आमचं पाऊल असेल एवढं त्याला या माध्यमातून सांगा. कोणी नुसतं धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेलं नाही. रात्रंदिवस ४० वर्षे मतदारसंघात काम केलेली माणसं आहे. आणि आमच्या छाताडावर पाय देण्याअगोदर आम्हाला पाय नाहीत का ?, एका दणक्यात आम्ही तुमच्या डोक्यावर पाय देऊन मोकळं होऊ, असं ते म्हणालेत.

Team Global News Marathi: