‘मुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरी..’; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

 

आज सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू आहे. दरम्यान आता यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या यंत्रणांना देशातल्या कुठलाही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ते म्हणाले, की अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेकदा नोटिसा आलेल्या आहे. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. आयटी असेल, ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी, सीआयडी, पोलीस क्राईम ब्रँच असेल या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे.त्या यंत्रणांना देशातल्या कुठलाही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार आणि सध्याची राज्यातील परिस्थिती यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, की राज्याच्या प्रमुखांनी ताबडतोब मंत्रिमंडळ स्थापन करावी, पालकमंत्री नियमावेत. एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरीही ते सगळीकडे पोहोचू शकत नाहीत असा टोला सुद्धा तिन्ही लगावला होता.

Team Global News Marathi: