‘मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले’

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. शिवसैनिक जमू लागल्याने पोलिसांचा आणखी फौजफाटा मागविण्यात आला आहे. राऊत यांना ईडी आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. यातच शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत हे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरले. उद्धव ठाकरेंना मी दोष देणार नाही, परंतू त्यांचे मन राऊतांनी वळविले. रोज सकाळी ते रात्री झोपेपर्यंत राऊत टीका करत सुटायचे. महाविकास आघाडीचे एजंट सारखे वागत होते. राऊत माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी सांगितलेले हे थांबवा, परंतू ऐकतील ते संजय राऊत कुठले, असे रामदास कदम यांनी म्हटले.

माझा मुलगा योगेश कदम याला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी अनिल परब यांनी काम केले. आमची नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम त्यांनी केले. शिवसेना कोणी संपविली? याच लोकांनी असा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अजित पवार १० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरेंना बरे नव्हते, त्यामुळे ते मंत्रालयात जात नव्हते. यामुळे पवारांना आंदनच मिळाले असा आरोप कदम यांनी केला. संजय राऊत हे खचणारे नाहीत. ते ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायचे, आपण पाहिले. यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील असेही कदम म्हणाले.

‘मुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरी..’; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

धक्कादायक | रात्रीच्या अंधारात बापानेच ३ वर्षाच्या मुलाला खड्ड्यात पुरलं

Team Global News Marathi: