युक्रेनने हॅकर्सच्या मदतीने रशियावर केला मोठा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाइड जाम

 

नवी दिल्ली | युक्रेनवर सातत्याने सायबर हल्ले सुरू आहेत. यासाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. मात्र, आता हॅकर्सच्या एका गटाने थेट शत्रू राष्ट्र असलेल्या रशियाविरुद्धच सायबर युद्ध सुरू केले आहे. सध्या शियन सरकारच्या अनेक वेबसाइट्सना निशाणा करत असून त्या बंद केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

या गटाला रिप्रझेंट करण्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटने, आपण रशियन सरकारविरुद्ध सायबर-युद्धाची सुरुवात केल्याचे म्हटले आहे. याशिवाय, रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाई केल्याने, आपण रशियाच्या डझनावर वेबसाइट्सना निशाणा बनवून त्या डाऊन केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते.

या सायबर हल्ल्याशीसंबंधित एका अकाउंटवरून ट्विट करण्यात आले होते, की आम्ही legion आहोत. पुतिन यांच्या काळात ज्या लोकांचा जीव गेला, ते विसरणार नाही. याच्याशीच संबंधित आणखी एका अकाउंटवरून ट्विट करण्यात आले, की पुतिन यांची वेळ संपली, आता या अॅटॅकपासून रिकव्हर करण्यासाठी बराच वेळ लागेल.

Team Global News Marathi: