ईडी कोठडीत असलेल्यामंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जे जे रुग्णालयात हलवले

 

मुंबई | मनी लॉन्डरिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडीची ठेवण्यात आले आहे मात्र दुसरीकडे मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी ईडीचे पथक मलिक यांच्या घरी दाखल झाले होते त्यानंतर चौकशी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले आहे मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयासमोर तीन मागण्या केल्या होत्या नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी मलिक यांनी केली होती. ती मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे

Team Global News Marathi: