उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू, उदय सामंतांनीं लगावला आदित्य ठाकरेंना टोला

 

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार शाब्दिक शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे अशातच आता काल आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात संवाद यात्रेत थेट उद्योगमंत्री उदय सामंत याच्यावर निशाणा साधला होता. यावरून आता सामंत यांनी पलटवार करत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.

मला उद्याेग खाते कळले न कळले हा पुढचा मुद्दा आहे. मी कधी दुसऱ्यांच्या खात्यात हस्तक्षेप केलेला नाही; पण उद्याेग खात्यामध्ये नक्की काय उद्याेग झाले आहेत, हे मी शाेधून काढणार आहे, असे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता.

त्यावर मंत्री सामंत म्हणाले की, या खात्यात नक्की काय, काय उद्याेग झाले आहेत ते मी शाेधून काढणार आहे. वेदांता फाॅक्सकाॅन कंपनी यांच्याशी बैठक कधी झाली, काय करार झाला, याची उत्तरे तत्कालीन उद्याेगमंत्र्यांनी दिली पाहिजेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आशिष शेलार यांच्याकडे काही पुरावे असल्याचे सांगितले आहे. ते माझ्याकडे देतील, तेव्हा पुढे बघू, असेही ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: