शिंदे गटाचा अर्ज मुंबई मनपाने स्वीकारला तर ठाकरे सरकारचा फेटाळला ?

 

शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० समर्थक आमदार आणि १२ खासदारांचा गट तयार झाला. हा गट आता शिवसेनेवर दावा सांगू लागला आहे. अशातच शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा कोण घेणार यावर वाद सुरू झाला. दोन्ही गटांमध्ये या दसरा मेळाव्यासाठी चढाओढ सुरू होती. पण आता हा संघर्ष शेवटाकडे आलाय, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला होता. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच आता शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानासाठी केलेला अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. तर शिवसेनेचा बीकेसीतल्या मैदानाचा अर्ज हे मैदान आरक्षित असल्याने फेटाळला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर इथल्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेतला जातो. मात्र यंदाच्या बंडाचा फटका बसल्याने अद्याप दसरा मेळाव्याबद्दल काहीही निर्णय झालेला नाही. शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे मैदान कोणाला मिळणार याबद्दल कोणताही निर्णय महापालिकेने दिलेला नाही.

Team Global News Marathi: